दिलीप प्रभावळकर, म्हणजे लेखन आणि अभिनय क्षेत्रातील एक खणखणीत नाणं. चिमणराव, एक डाव भुताचा मधला मास्तुरे, चौकट राजा, चेटकीण, तात्या विंचु, लगे रहो मुन्नाभाई तला बापू, एनकाउंटर मधला पुनप्पा, सरकार राज मधला राव साहेब, वासुची सासू, रात्र आरंभ अशा अनेकविध नाटक, सिनेमा, मालिकातुन आपल्याला हसवत, भावनाविवश करत किंवा आश्चर्यचकित करत आले आहेत. नातीगोती, श्रीयुत गंगाधर टिपरे, हसवाफसवी, चौकट राजा मधल्या भूमिका मला विशेष आवडतात. त्याशिवाय आपल्या आजूबाजुला घडणाऱ्या घटनांवर मार्मिक भाष्य, त्यांच्या खुसखुशीत शैलीत करणारे एक प्रतिभावंत लेखक. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी अजून आली नाही. पण cincinnati मधे त्यांच्या पत्रापत्री या नवीन नाट्य प्रयोगानिमित्त ते आले असता, माझ्या बहिणीने आवर्जून भेटून माझ्यासाठी त्यांच्याच पुस्तकावर स्वाक्षरी घेतली. माझ्यासाठी ही खरंच एक अमूल्य गोष्ट आहे. देव प्रभावळकर काकांना उदंड आयुष्य देवो जेणेकरून ते आणखी छानछान कलाकृती करून आपल्याला समृद्ध करतील, आणि लवकरच मला सुद्धा त्यांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळेल.

No comments:
Post a Comment